माझ्या ब्लॉगचं नामकरण..

नुकताच माझ्या ब्लॉगचा नामकरण विधी पार पडला. मी एकटाच या सोहळ्यात उपस्थित होतो... amythart.in हे नाव ब्लॉगला दिलं..
आम्ही कोण?? तर “Amyth is A Myth” या संकल्पनेवर आधारित मी हे ब्लॉग चं नाव ठेवलं...!!





असो... आता लोकं नावाजतात की नावं ठेवतात हे पुढे हळू हळू समजेलच... !!!

सुलेखन.. प्रेमाचं...!!!

मेघ नसता वीज नसता, मोर नाचू लागले..
जाहले इतुकेच होते, कि तुला मी पाहिले..
संदीप खरेच्या काही निवडक आवडत्या कवितांपैकी ही एक माझी फार आवडती कविता आहे.. असंच स्केचिंग करत होतो तेव्हा ही ऐकत बसलेलो.. अन् तेव्हा या ओळी लिहून काढल्या.. आणि हे इलस्ट्रेशन केलं..!!

  1. जाहले इतुकेच होते... (Created Feb.11)

पुन्हा रेडिओ..

रेडिओ.. हे आमचं नाटक.. आमचं म्हणजे प्रयोगशाळा निर्मिती, पुणेचं...!! खुप्प छान अन विनोदी एकांकिका.. विनोदोत्तम करंडकासाठी केली होती.. यात मोनिका दबडे हिला अभिनयाला.. अन संदीप भामकर याला नेपथ्यात उल्लेखनीय कामगिरी म्हणून हे पुरस्कार प्राप्त झालेत.. तसेच पुन्हा गडकरी करंडकासाठी ही एकांकिका पुन्हा केली तेव्हा मोहिनी गाडगीळ हिला अभिनयाचं.. अन् संदीप भामकर याला नेपथ्याचा पुरस्कार प्राप्त झालाए...!!! आता ही एकांकिका ज्ञानक्रांती करंडकासाठी केली तेव्हा हे पोस्टर बनवलं होतं...

People participated in this draama:
Script writing, and direction : Chetan Thorat
Music : Pradyumna Chaware
Art Direction : Sandeep Bhamkar
Lights : Amit Waghchaure
Acting: monika dabade, chetan thorat, antara patil, prathamesh daptare,
nakul sutar, ajinkya bhosale, mohini gadgil, sanket belsare, sandeep bhamkar
Backstage: Deepak pande, nilambari gaikwad, shilpa nair, ankur aserkar, Yashodhan Mandke, Shabdashri Avalagaonkar, varun vaidya...!

  1. रेडिओ.. (Created Jan. 11)

पेन टॅब्लेट...

हे माझं पहिलं पेन टॅब्लेटचं स्केच..
खरंच भारी मजा येते टॅब्लेट वर काम करायला...!!!


  1. वडाचा पार (Created jan. 11)

लोगो...

MMCC कॉलेजच्या आर्ट सर्कलचा लोगो बनवत होतो.. मला हे डिझाईन खूप आवडलं... यात ब्रशचे स्ट्रोक्स भारी आल्येत... आणि एकसंघता दिसून येतीये...!!! म्हणून मी हा असा लोगो बनवला.. नवीन करणारच आहे.. पण जो आवडला तो तुम्हाला दाखवावा म्हणून अपलोड केला..!!!


  1. लोगो.. (Created jan. 11)